पिंपरी : चिंचवड विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे धक्के बसले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन माजी नगरसेवकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा न देता वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. माजी नगरसेवक अनंत कोराळे यांनी अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना, तर मोरेश्वर भोंडवे यांनी भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा दिला आहे. या सगळ्या घडामोडींचा परिणाम महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडणुकीत अडचणी निर्माण होऊ शकतात.
विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. अवघे काही दिवस शिल्लक असताना अनेक इच्छुकांनी आपापल्या समर्थकांच्या कळपात जाऊन समझोता घडवून आणला आहे. महायुती मधील अनेक बंडखोरांना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित व गटातील वरिष्ठ नेत्यांनी शांत केले आहे. तसेच त्यांना प्रचारातही एकत्रित एक दिलाने समाविष्ट करून घेतल्याने महायुतीसाठी आशादायी वातावरण तयार झाले आहे.
चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अनेक जण इच्छुक होते यामध्ये प्रामुख्याने नाना काटे, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, मोरेश्वर भोंडवे, सिद्धेश्वर बारणे, शितल शिंदे या सर्व इच्छुकांना माहितीचे उमेदवार शंकर जगताप यांनी एकत्रच आणून आपल्या बाजूने उभे केले आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. त्यातच महाविकास आघाडीतील दोन माजी नगरसेवकांनी थेट आघाडीचा धर्म न पाळता दुसऱ्या उमेदवारांना मदत केल्यामुळे महाविकास आघाडीसाठी बुडत्याचे पाय खोलात जाताना दिसत आहेत.