पिंपरी : पिंपरी विधानसभेतील महायुतीतील नाराज आणि असंतुष्ट गट एकत्र येऊन आगामी निवडणुकीत अण्णा बनसोडे यांना विजयी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे समोर आले आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पुढाकार घेतला.
महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना समर्थन देण्यासाठी महायुती मधील सर्व पक्षाच्या विविध गट एकत्र आले आहेत. यामध्ये उद्योजक श्री असवानी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, शितल शिंदे, काळूराम पवार आणि डब्बू असवानी यांचा समावेश आहे.
या सर्वांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपापसातील मतभेद मिटवले आणि महायुतीच्या उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे ठरवले.




