पिंपरी : नागपूर येथे आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये भाजपच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र पिंपरी चिंचवड शहरातील तीन वेळा निवडून आलेले अण्णा बनसोडे, महेश लांडगे व जगताप कुटुंबीयातील शंकर जगताप यापैकी कोणत्याही आमदाराला मंत्रिपद न दिल्याने शहराच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे.
नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यामध्ये, 33 कॅबिनेटमंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात 4 लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह आदिती तटकरे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ हे दोन नवे चेहरे मंत्रिमंडळात आले आहेत.
राज्यात भाजप सोबत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना व सत्तेत आहे भाजपने लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्रीपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड केली तर राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पुण्यामधीलच कोथरूड चे आमदार चंद्रकांत पाटील व आमदार माधुरीताई मिसाळ यांना मंत्रीपदाची संधी दिली . नेहमीप्रमाणे पिंपरी चिंचवड शहराला पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहराने सलग तीन वेळा भोसरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात दिले आहेत. त्याचबरोबर 2017 च्या महापालिका निवडणुकीत ही भाजपला पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी भाजपला एक हाती सत्ता दिली होती असे असतानाही पिंपरी चिंचवड शहराला नेहमी मंत्रीपदापासून लावण्यात येत आहे. ना काबिनेट ना राज्यमंत्री कोणतेही पद पिंपरी चिंचवड शहर का दिले नाही असा सवाल नागरिक करत आहे
मुख्यमंत्र्यांसह एकूण 42 मंत्री
राज्यातील महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री, दोन उपख्यमंत्री आणि 39 मंत्री असे एकूण 42 मंत्र्यांचा शपधविधी संपन्न झाला आहे. राज्याती मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 43 आहे, त्यामुळे, अद्यापही एक जागा शिल्लक असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, 42 मंत्र्यांमध्ये 4 महिला नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तर, 39 कॅबिनेट व 6 राज्यमंत्री आहेत. अद्याप खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे, नेमकं कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




