पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संभाजीनगर येथील गार्डन नूतनीकरणाचे काम मागील चार वर्षापासून रखडले आहे. यामध्ये लाल मातीचा जॉगिंग रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे बनले आहे. याठिकाणी कोणतीही साफसफाई केली जात नाही.
येथे नव्याने महापालिकेच्या उद्यान विभागाकडून वृक्षारोपणाचे काम सुरू आहे. पण पाने नसलेली आणि सुकलेली झाडे लावण्याचा सपाटा सुरू आहे. याकडे उद्यान विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? झाडे लावल्यानतर नियमित पाणी देण्याची कोणतीही उपाययोजना केली नाही. असे असताना वृक्षारोपण कशासाठी आणि कोणासाठी केले जात आहे.
बाजूला असणाऱ्या गार्डन मध्ये सुंदर व नियोजन बद्द गवत कापणी, झांडांना पाणी देणे, नवीन वृक्ष लागवड आणि दैनंदिन देखभाल केली जाते. तर एका भिंती पलीकडे असणारे संभाजीनगर गार्डन मध्ये विरुध्द चित्र आहे. वर्षानुवर्ष रखडलेले सुशोभीकरण आणि मोडतोड, झाडांची कत्तल असे अनेक प्रकार सुरू आहेत. त्यातच नव्याने झाडे लावण्याचा दाखवू पणा सुरू आहे. यामुळे वृक्षारोपण फक्त दिखावाचे आहे का, ठेकेदारांना पोसण्याचा नवीन फंडा असा प्रश्न उपस्थित नागरिक उपस्थित करत आहेत.




