पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली कुदळवाडीमध्ये अनधिकृत बांधकामाच्या कारवाईला नागरिकांचा प्रचंड विरोध होताना दिसत आहे. मुख्य रस्त्यावर कारवाई होत असल्याने रस्त्यावरती वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी मनोज लोणकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कुदळवाडीमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, कारवाईला विरोध दर्शवत नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.
काय करावे….
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामावर कारवाईला नागरिकांचा प्रचंड विरोध होणे हे एक महत्त्वाचे समाजिक व प्रशासकीय प्रश्न आहे. अनधिकृत बांधकामाच्या कारवाईसाठी महापालिका नियमानुसार पाऊले उचलत असली तरी नागरिकांची प्रतिक्रिया त्यांच्यादृष्टीने महत्त्वाची असते. नागरिकांची बाजू समजून घेत, त्यांचा विरोध कमी करण्यासाठी संवाद आणि समजुतीचे वातावरण तयार करणे आवश्यक आहे.




