चिंचवड : महानगरपालिकेने विविध ब्रीदवाक्यांसह रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी अनेक वॉल पेंटिंग केले आहेत, परंतु “एक पाऊल स्वच्छतेकडे” हे वाक्य केवळ रस्त्यांवरच लागू होत आहेत का? कृष्णा नगर प्रभागातील जॉग्रस पार्क आणि इतर काही उद्याने या बाबतीत दुर्लक्षीत झाली आहेत. या उद्यानांच्या स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून, महापालिकेच्या प्रशासनाने याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
जॉगिंग ट्रॅक आणि गार्डन्समध्ये पानाच्या असलेल्या कचऱ्यामुळे तेथे फिरायला आलेल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे, उद्याने स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
उद्याने स्वच्छ ठेवण्यासाठी, योग्य निगराणी आणि नियमित देखभाल आवश्यक आहे, तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला नागरिकांच्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा विचार करून आवश्यक कारवाई लवकरात लवकर करावी लागेल, असे म्हटले जात आहे.
#पिंपरीचिंचवडमहापालिका #स्वच्छता #उद्यानांचीस्वच्छता #एकपाऊलस्वच्छतेकडे




