
पुणे : शक्रवार पेठेतील शाहु चौकाजवळील अंग्रेवाडा येथे सुरु असलेल्या अंग्रेवाडा येथे छापा टाकून जुगार खेळणार्या एका महिलेसह ३२ जणांना पकडले. त्यांच्याकडून १ लाख ४६ हजार ४२० रुपयांची जुगाराची साधने मोबाईल व रोख रक्कम जप्त केली आहे. सुनिल भाऊ मुंडे हा पत्त्यांचा क्लब चालवत होता.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व अवैध धंदे बंद करायचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बहुतांश अवैध धंदे बंद असताना शुक्रवार पेठेसारख्या मध्य वस्तीत एकाच वेळी इतके लोक जुगार खेळण्यासाठी जमलेले दिसून आले. दिघी पासून धनकवडीपर्यंत, गोखलेनगरपासून नाना पेठ आणि भवानी पेठेपासून नांदेडसिटीपर्यंतच्या भागात राहणारे या जुगार अड्ड्यावर जमले होते.
पत्त्यांचा क्लबच्या मॅनेजर भास्कर दत्तात्रय पंडीत (रा. संतनगर, अरण्येश्वर), घनश्याम ज्ञानेश्वर गुलापिल्ले (वय ४२, रा. भवानी पेठ), गणेश लक्ष्मण कांबळे (वय ३८, रा. भवानी माता मंदिराजवळ, भवानी पेठ), भागवत सखाराम कटारे (वय ३३, रा. कर्वेरोड, कोथरुड), आनंद सतिश खिवंसरा (वय ४५, रा. रविवार पेठ), निलेश रोहिदास गव्हाणे (वय ४२, रा. पर्वती दर्शन), शेखर चंद्रकांत जगताप (वय ५५, रा. काकडे वस्ती, कोंढवा), आशिष ज्ञानेश्वर राशणकर (वय ३५, रा. धनकवडी, आंबेगाव), गुड्डु रणजित रवानी (वय ३०, रा. हडपसर, माळवाडी), सतेंद्र सुनिल सिंग (वय २७, रा. माळवाडी, हडपसर), नवाज निझन पठाण (वय ४२, रा. गुरुनानक नगर, भवानी पेठ), रसुल बरसु शेख (वय ३०, रा. अपर डेपो), प्रदीप दशरथ खवळे (वय ४३, रा. जनता वसाहत),
विलास गणपत काळे (वय ६३, रा. धनकवडी), बाळासाहेब बळीराम साठे (वय ३७, रा. अपर इंदिरानगर), कुमार गुंडा माने (वय ६०, रा. संतोषनगर, कात्रज), दीपक अर्जुन बागल (वय ६०, रा. ताडीवाला रोड), राकेश सुरेश मसुळे (वय ३२, रा. नांदेड सिटी), उमेश दत्तात्रय काळे (वय ४४, रा. गोखलेनगर), विष्णु रघुनाथ ढगे (वय ४८, रा. धनकवडी), दत्ता वसंत सितप (वय ५३, रा. संकल्प सोसायटी, आंबेगाव), बाळु किसन भेलके (वय ४८, रा. बालाजीनगर, धनकवडी), विलास विक्रम माने (वय ४७ रा. भारतमातानगर, दिघी), योगेश सतिश डेंगळे (वय २७, रा. अपर ओटा), विकास राजाभाऊ अडसुळ (वय ४७, रा. अपर बिबवेवाडी), दत्ता आबरावु शेटे (वय ५७, रा. जवाहर बेकरी शेजारी), बाळु शंकर कांदे (वय ५०, रा. शुक्रवार पेठ), बजरंग बाबुराव डोळसे (वय ५७, रा़ स्वारगेट), सचिन यशवंत माने (वय ५०, रा. राजवाडी, नाना पेठ), विकास सुभाष बनसोडे (वय ३५, रा. धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
जुगार खेळणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यात हजर राहण्याची समज देण्यात आली आहे. जुगार अड्डा मालक सुनिल भाऊ मुंडे (रा. अंग्रेवाडी, शुक्रवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्याकडून खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना आदेश दिला की, अंग्रेवाडा येथे जुगार खेळला जात आहे. तेथे जाऊन कारवाई करा.




