पंढरपूर : आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. अनेक विभागांमध्ये मुलींनी बाजी मारत आपला ठसा उमटविला. विठूरायाच्या पंढरीत शेतातली कामं करून आणि गुरांच्या धारा काढून शिक्षण घेणाऱ्या विशाल सलगरची सध्या गावात एकच चर्चा झाली आहे.
अनेक मुला मुलींना 90% पेक्षा अधिक मार्क मिळाले आहेत. तर काहींना कमी अधिक प्रमाणात मार्स मिळाले परंतु पंढरपूर येथील या पठ्ठ्यानं आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सगळ्या विषयांत काठावर पास होत दहावीचा टप्पा पार करत यश संपादन केले. सगळ्या विषयात 35 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने गावकऱ्यांनी त्याचा जंगी सत्कार केला.

पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथे राहणारा विशाल सलगर हा शेतीतील सर्व कामे करून शिक्षण घेत होता. विशाल सलगर याला सर्व विषयांमध्ये 35 गुण मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थ आणि मित्रमंडळींनी त्याला हार घालून आणि पेढे देत त्याचा सत्कार केला.
विशाल सलगर याला सर्व विषयांमध्ये 35 गुण मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थ आणि मित्रमंडळींनी त्याला हार घालून आणि पेढे देत त्याचा सत्कार केला. पस्तीस टक्के गुण घेऊन महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी चढणाऱ्या विशालने आता पुढे चांगले मार्क मिळवणार असल्याचे सांगितले आहे.



