
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
या वर्षीच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत चॅलेंजर पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप पाडत सलग पाचव्या वर्षी १००% निकाल मिळवला आहे. हा निकाल केवळ टक्केवारीचा नव्हे तर शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता, नेतृत्व, शिक्षकांचा समर्पण आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचा विजय आहे.
या यशामागे शाळेचे अध्यक्ष संदीप काटे आणि प्राचार्या सुविधा महाले यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, तसेच सर्व शिक्षकवृंदाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. विद्यार्थ्यांच्या चिकाटीबरोबरच पालकांचा विश्वास व पाठिंबा देखील या यशात मोलाचा वाटा उचलतो.
यंदाचे गुणवत्ताधारक विद्यार्थी:
चिन्मय भुते – ९७.६%
श्रावणी बडगुजर – ९६.८%
अद्विका डावखर – ९६.२%
जान्हवी जोशी – ९५.६%
भव्यादित्य मोहंती – ९५.०%
या यशाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम निकालासह आपले भविष्य उज्वल केले आहे. गुणवत्तेचे आणि सचोटीचे जे मानक चॅलेंजर पब्लिक स्कूलने प्रस्थापित केले आहे, ते टिकवून ठेवण्याची परंपरा यंदाही कायम राहिली.
शाळेच्या सातत्यपूर्ण यशामागे असलेली एकजूट, शिस्तबद्धता आणि शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेचा ध्यास यामुळे चॅलेंजर पब्लिक स्कूल आज शिक्षण क्षेत्रात एक विश्वासार्ह नाव ठरत आहे.
