वाकड येथील सावित्रीबाई फुले अकादमीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पुर्व परीक्षा-२०२६ पुर्ण वेळ विनामुल्य निवासी प्रशिक्षण देण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचे २७ जूलै २०२५ रोजी आयोजित केले आहे.
राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, मुंबई यांचे तर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित सावित्रीबाई फुले अकादमी, वाकड तसेच इतर प्रशासकीय पुर्व प्रशिक्षण संस्थामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पुर्व परीक्षा २०२६ साठी पुर्णवेळ विनामुल्य निवासी प्रशिक्षण देण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील रहिवासी पुरावा असलेल्या सर्व संवर्गातील ५० विद्यार्थ्यांना सावित्रीबाई अकादमीमध्ये ११ महिन्याकरिता प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना विनामुल्य निवास व्यवस्था, प्रतिमहा रु.४०००/- प्रमाणे विद्यावेतन, अद्ययावत पुस्तकांसह ग्रंथालय, एसी अभ्यासिका,व्याख्यानकक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच तज्ञांचे मार्गदर्शन देखील उपलब्ध करुन देण्यात येते.
या प्रवेश प्रक्रीयेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरूवात ३ जुनपासुन झाली असुन २७ जुन २०२५ पर्यंत ही मुदत आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याकरिता www.siac.org.in , www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अकादमी वाकड यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान श्री.रंगनाथ नाईकडे, संचालक, सावित्रीबाई फुले अकादमी यांनी केले आहे.




