पिंपळे सौदागर, १६ जून – शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ला आज १६ जूनपासून सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पिंपळे सौदागर येथील प्राथमिक शाळा क्रमांक ५१ मध्ये ‘विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते शाळेत दाखल होणाऱ्या चिमुकल्यांचे फुल देऊन मनपूर्वक स्वागत केले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट व गणवेशाचे वाटप
याप्रसंगी प्रथम दिवशीचे आकर्षण असलेली शालेय पाठ्यपुस्तके, शैक्षणिक किट आणि गणवेशाचे वाटप मा. नाना काटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमास पालिकेच्या संगणक विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता मा. नीलकंठ पोमन साहेब, मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा गेंगजे मॅडम, बालवाडीच्या पर्यवेक्षिका मा. खंडागळे मॅडम, आकांक्षा फाउंडेशनचे सदस्य, उद्योजक श्री. सोमनाथ खेडेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, सर्व शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या नव्या वाटचालीस शुभेच्छा!
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाबाबत उत्सुकता आणि उमेद निर्माण झाली. शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा यासाठी शिक्षक व पालकांनी घेतलेली मेहनत आणि उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. असे नाना काटे यांनी म्हटले आहे.




