पिंपरी: इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, पिंपरी-चिंचवड शहरातील 225 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत, तर पालिका शाळांतील 17 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता पाचवीसाठी 9 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरातील 362 शाळांमधून 8409 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 2782 विद्यार्थी पात्र ठरले असून, 126 विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. इयत्ता पाचवीचा निकाल 34. 38 टक्के लागला आहे. पाचवीचे 11 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 280 शाळांमधून 6007 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1615 विद्यार्थी पात्र ठरले असून, 99 विद्यार्थी पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आले आहेत. इयत्ता आठवीचा निकाल 27.86 टक्के लागला आहे. आठवीचे सहा विद्यार्थी पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी
इयत्ता पाचवी : स्वरा ढवळे, सर्वेज्ञा गायकवाड (विद्यानिकेतन प्राथ. शाळा पिंपरी), राधिका आंग्रे (पिंपळे गुरव प्राथ. शाळा), आरोही नेहारकर (नेवाळे वस्ती प्राथ. शाळा), राजहंस वाघमारे, प्रणव वाघमारे (मोशी मुले प्राथ. शाळा), शाह अबु अकिब अबु तारीक (मरहम फकिरभाई पानसरे प्राथ. शाळा उर्दू), प्रज्ञा काळे, स्नेहल चव्हाण, अमृता शिंदे (जाधववाडी कन्या शाळा), आरोही जोशी (कै. दत्तोबा काळे इंग्लिश मीडियम स्कूल, काळेवाडी), इयत्ता आठवी : शशिकला थोरात, फरहिन शेख, आदिती पवळे (जाधववाडी कन्या शाळा), महेर विश्वकर्मा (बोपखेल प्राथ. शाळा क्र. 101), निशा गायकवाड (मोशी कन्या शाळा), शुभम इतागी (जाधववाडी मुले शाळा)




