
- साखर कारखान्याचा शेतकरी मेळावा व कालव्याच्या पाण्याच्या माध्यमातून ऊस लागवड
कामशेत : नाणे मावळातील वडीवळे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पात्रातुन शेतकऱ्यांना सत्तावीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरू झाला.यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला. यावेळी कालव्यातून उपलब्ध झालेल्या पाण्याच्या मदतीने आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते ऊस लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, बाळासाहेब गायकवाड,माजी संचालक शिवाजीराव टाकवे, मा. सभापती गणपत शेडगे, पं.स.मा.सदस्य दीपक हुलावळे, मा.सरपंच साईनाथ गायकवाड,किशोर सातकर,दीपाली साबळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती बबनराव भोंगाडे,उपसभापती गजानन शिंदे,पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर,उपअभियंता अशोक लाटे,शाखा अभियंता मनोहर खाडे,कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी.पठारे,स्वप्नील गावडे,प्रदीप सावंत,सुनील काळे,मयुर भेगडे,सखाराम काळे आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माऊली दाभाडे म्हणाले,वडीवळेच्या डाव्या कालव्यामुळे चार हजार सहाशे एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.शेतीला पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ सत्कारणी लागणार आहे.शेती समृद्ध झाली तर कुटुंब समृद्ध होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सुरळीत होईल.कालव्याच्या आवर्तनाबाबत बोलताना,पाटबंधारे विभागाचे राजेंद्र धोडपकर म्हणाले,सर्व शेतकऱ्यांना पाणी परवानगी पंधरा दिवसात देण्यात येईल.पिकांच्या गरजेनुसार चौदा किंवा एकवीस दिवसांनी पाण्याची आवर्तने सोडण्यात येईल.
आमदार सुनील शेळके म्हणाले,शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी आहे.पाणी उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.तसेच शेतकऱ्यांनी पीडिसीसी बँकेच्या योजनांचा फायदा घ्यावा.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तू आंद्रे यांनी केले.भाऊसाहेब मोरमारे व भाऊसाहेब दाभणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
