देहूरोड ( वार्ताहर ) देहूरोड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने येथील पेट्रोल पंपावर शुक्रवारी ( दि.१ ) मोदी सरकारच्या विकासाचा जन्मदिवस म्हणून एप्रिल फूल साजरा करण्यात येऊन,पेट्रोल,गॅस दरवाढीच्या निषेधार्थ घोषणा देत मोदी सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
मोदी सरकार हे फक्त आश्वासन देत आहे .नागरिकांना विकासाचे स्वप्न दाखवत आहे . महागाईचा भस्मासुर झाला असल्याने प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आदेशान्वये एप्रिल महिन्याचे औचित्य साधून देहूरोड येथे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनात मोदी सरकार विरोधात निषेध आंदोलन घेण्यात आले.
पुणे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, युवक तालुकाध्यक्ष किशोर सातकर, देहूरोड युवक अध्यक्ष आशिष बंसल, राष्ट्रवादी शहराध्यक्ष ऍड कैलास पानसरे, महिला अध्यक्षा शीतल हगवणे, ऍड प्रवीण झेंडे, धनराज शिंदे, मिकी कोचर, शंकर स्वामी, बाळासाहेब जाधव आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.