कोल्हापूर : कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीला रंग चढला असून विविध राजकीय नेते प्रचारासाठी दाखल झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि अन्यविरोधकांवर आरोप केले आहेत. पेटीएमच्या माध्यमातून मतदारांना पैसे देण्याची ही तयारी आहे, असं त्यांनी म्हटलं.
कोल्हापूर उत्तरसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटपाची तयारी सुरू असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी नागरीकांना १००० रुपये तुमच्या अकाऊंटला आले, तरी तुमची ईडी चौकशी होईल असा दम ठोकला आहे. तर पुढे म्हणाले आजच मी ईडीला पत्र लिहित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मोठ्या प्रमाणात काळात पैसा पेटीएमच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर होणार आहेत, असं पाटील यांनी आरोप केला आहे.
मतदारांच्या खात्यांमध्ये एक हजार रुपये आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पेटीएममार्फत हे पैसे वाटप झाल्याचं त्यांनी म्हटलंय. एका काँग्रेसच्या नेत्याने दारूच्या दुकान मालकांची बैठक घेतली. एका अधिकाऱ्याने काँग्रेसला मतदान करण्याचा दम देखील भरला. मात्र, भाजप हे मान्य करणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आम्ही या अधिकाऱ्यांना घेराव घालू, पीडीसीसीत दमबाजी, गोकुळमध्ये दमबाजी सुरू आहे. या ठिकाणचे अधिकारी तुम्ही घरचे समजता. पण भाजपं तसं होऊ देणार नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे.



