चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील सर्वाधिक जुन्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालय व मोहननगर शिवसेना शाखा नूतनीकरण करण्यात आले. या नवीन वाचनालयाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेना उपनेते, सातारा संपर्कप्रमुख नितीनजी बानगुडे पाटील, पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख वैभव थोरात यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरूवात प्रभागांतील अंध व्यक्तींच्या संगीताने सुरू करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये फीत कापून उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. प्रभागाच्या नगरसेविका सौ मीनल यादव यांनी प्रथम सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी नितिन बानगुडे पाटील, वैभव थोरात , सौ सुलभा उबाळे, शहरप्रमुख सचिन भोसले, राजेश वाबळे, युवराज कोकाटे, भाविक देशमुख, सौ वैशाली मराठी असे अनेक मान्यवरानांचे सन्मान व स्वागत करण्यात आले. स्वागतामध्ये नगरसेविका सौ मीनल यादव यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या विविध विकासकामांचा, करोणाच्या काळामध्ये पुरविलेल्या सेवांचा, मदतीच्या कामांचा उजाळा दिला.
त्यानंतर शिवसेनेच्या वैभव थोरात यांनी नगरसेविका मीनल यादव व शिवसेना संघटक विशाल यादव यांच्या कामाचे विविध विकासकामांचे कौतुक केले. त्यानंतर शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी “शिवसेना काल आज आणि उद्या” या विषयावर साधारणत एक ते दीड तास आपले व्याख्यान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अक्षय मोरे तर आभार शिवसेना शहर संघटक विशाल यादव यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन मोहननगर शिवसेना शाखा, विशाल यादव युवा मंच, अष्टविनायक मित्र मंडळ, युवा सहकारी, ज्येष्ठ शिवसैनिक यांनी केले.



