मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता भाजपाच्या नेत्यांनी राऊत यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया देत भाजपावर निशाणा साधाला. भाजपाकडे महाविकास आघाडीतील नेत्यांना सूडाच्या राजकारणा अंतर्गत लक्ष्य केलं जात असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. या कारवाईसंदर्भात राष्ट्रवादीची भूमिका मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मांडली आहे.
महाविकास आघाडी सरकारची अजून एक मुलुख मैदानी तोफ संजय राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली असं ऐकलं. हे काय चाललं आहे? हे सूडाचं राजकारण महाराष्ट्रात सुरु आहे असं तापसे म्हणाले. २०१९ मध्ये राज्यात सरकार न बनवून शकलेली भाजपा सूडाच्या राजकारणाच्या माध्यमातून महाविकासचे आघाडीची बलस्थान आहेत, शक्तीशाली नेते आहेत त्यांना टप्प्याटप्याने लक्ष्य करण्याचं काम करत आहे असा आरोप तापसेंनी केला आहे.



