महाराष्ट्र माझा, ६ एप्रिल
28 मार्च रोजी प्रभाग क्र. 28 रहाटणी पिंपळे सौदागर येथील बीआरटी शेजारील लिनियर गार्डन लगत स्टॅगड पोल प्रत्येक 10 मीटर अंतरावर बसविण्यात आले आहे. त्यानंतर हा परिसर दीपोत्सव सारखा सजला असल्याच्या बातम्याही आल्या. मात्र दिवाळी संपल्यानंतर आकाश दिवे काढले जातात त्याचप्रमाणे या गार्डन चे अनेक पोलवरील दिवे अद्याप सुरू नाहीत तर काही दिव्यांचे बल्ब गेले आहेत. नगरसेवक पद संपण्यापूर्वी स्थानिक नगरसदस्यांनी याचे काम मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. आता माजी नगरसेवक व इच्छुक नगरसेवक लिनियर अर्बन गार्डन पुन्हा प्रकाशमान करण्यासाठी पुढाकार घेणार का? अशी चर्चा परीसरात सुरू झाली आहे.

पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते पिके चौक दरम्यान लिनिअर गार्डन २८ मार्च रोजी दीपोत्सव सारखे उजळून निघाले होते. या ठिकाणचे सायकल ट्रॅक व फुटपाथ यांच्यामध्ये खूपच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आपण परदेशात आहोत की काय ? असा अभास होत होता. मात्र दिवसातच याची दुरावस्था झाल्याने आपण भारतातच आहोत याची प्रचिती नागरिकांना आली आहे.
येथील सायकल track वरती दुचाकी पार्किंग केल्या जातात. गार्डनमध्ये नागरिकांसाठी बसण्यासाठी seater च्या लाकडी पट्या निघून पडल्या आहेत. गार्डनच्या अंतर्गत लाईटची व्यवस्था दयनीय आहे. त्यामुळे केवळ दिवास्वप्न दाखवून उभारलेल्या या गार्डनचे बांधणी खरंच स्मार्ट पिंपळे सौदागर वर्हाडी अणि प्रभागासाठी साजेशी ठरेल का असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून उपस्थित होत आहे.




