पुणे : मशीदीवरील भाेंगे काढण्याचे प्रकरणावरुन तसेच अजानच्या भाेंग्यासमाेर माेठया आवाजात हनुमान चालिसा लावा अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली हाेती. परंतु महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे पुणे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत माेरे यांनी त्यास विराेध दर्शवल्यानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मशीदीवरील भाेंगे काढण्याचे प्रकरणावरुन तसेच अजानच्या भाेंग्यासमाेर माेठया आवाजात हनुमान चालिसा लावा अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली हाेती. परंतु महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे पुणे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत माेरे यांनी त्यास विराेध दर्शवत आपण अशाप्रकारे कृत्य करणार नसल्याचे सांगितले.
दरम्यान, याप्रकरणाची गंभीर दखल पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेत पुणे शहराध्यक्ष पदावरुन वसंत माेरे यांची हकालपट्टी करत त्याजागी नगरसेवक साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.



