पवनानगर : पिंपरी-चिंचवड शहराची व मावळ तालुक्याचे पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणातून आज दुपार पासून पाण्यावरती तेलासारखा थर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. तवंग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळाले आहे.

मावळ तालुक्याला सूंदर निसर्गाची देणं व कोकण पट्टीला लागून पवना धरण येत असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. येथे स्वच्छ आणि सूंदर पाणी नदीने वाहत असते. हे पाणी नेण्यासाठी पिपरी चिंचवड महानगरपालिकेने अट्टहास केला होता.मात्र शेतकरी विरोध दर्शविला होता. आणि मात्र याच पवना नदीचे पाणी आता दूषित होऊ लागले आहे. यामागचे कारण जरी आता स्पष्ट नसले तरी पाणी दूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. व नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर प्रशासनाने हे पाणी कशामुळे दूषित झाले आहे. याचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मी दुपारी साधारणतः 3 वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना मला नदीच्या पाण्यातुन तेलासारखा थर दिसला. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत मी सदर माहिती व प्रकार सोशल मीडियाच्याद्वारे समोर आणला : तानाजी आडकर (स्थानिक)



