टाकवे बुद्रुक – येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सातत्याने वीजेचा लपंडाव होत असल्याने रुग्ण सेवेत अडथळा येत असल्याची समस्या लक्षात घेऊन टाकवे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्हेरॉक कंपनीला सीएआर फंडाची मागणी करुन या निधीची साह्याने बॅटरी इन्वर्टर उपलब्ध करुन देऊन समस्या सोडविण्यात आली. यावेळी व्हेरॉक कंपनीचे प्लँट हेड गिरीश शेटे यांनी यापुढे कंपनीच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी हातभार लावू असे अश्वासन दिले.
अशाच पद्धतीने टाकवे औद्योगिक वसाहती मधील इतर कंपन्या च्या मदतीने गावाच्या विकासाचा आलेख सदैव उचांवत ठेऊ आशी माहिती सरपंच भुषण असवले यांनी यावेळी दिली बॅटरी इन्वर्टर उपलब्ध केल्याने यापुढे आरोग्य केद्रातील वीजेवरच्या उपकरणाचा २४ तास लाभ घेता येणार असुन रुग्ण सेवा जलदगतीने देण्यास मोठी मदत होणार असल्याने डॉ.नागेश डवळे यांनी बॅटरी इन्वर्टर उपलब्ध करुन दिल्या बद्दल व्हेरॉक कंपनी व ग्रामपंचायतीचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रम प्रसंगी व्हेरॉक कंपनीचे प्लँट हेड गिरीश शेटे ,एच आर हेड संतोष चव्हाण,प्रोडक्शन मँनेजर दत्तात्रय मोरे, सीडी हेड राजेश भेगडे, मेन्टनेस हेड,मनोज डवंगळे ,पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबाजी गायकवाड,सरपंच भुषण असवले,उपसरपंच परशुराम मालपोटे,सदस्य ज्योती आंबेकर,शिवक्रांती कामगार संघटनेचे संघटक विश्वनाथ असवले, गुणवंत कामगार नितीन कदम, युनियन लिडर अध्यक्ष भगवान शिंदे, उपाध्यक्ष रियाज अत्तार, आरोग्य अधिकारी डॉ.नागेश डवळे, आरोग्य निरीक्षक आनंद साबळे, आशा सेविका वंदना कदम,हेमा कदम रुपाली जाभुळकर ,यासह आरोग्य कर्मचारी उपस्थितीत होते.



