देहूरोड,दि.९ ( वार्ताहर ) राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांचा मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी घुसून केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष ॲड प्रवीण झेंडे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष आशिष बन्सल यांच्या नेतृत्वात मेन बाजार पेठेत नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात शुक्रवारी ( दि.८ ) सायंकाळी निषेध आंदोलन करण्यात आले .कार्यकर्त्यांनी ॲड गुणरत्न सदावर्ते आणि अनिल बोंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कडक कारवाई करण्याची मागणी केली.
माजी शहराध्यक्ष ऍड.कृष्णा दाभोळे, मिकी कोचर, धनराज शिंदे, शंकर स्वामी, रेणू रेड्डी, जाफर शेख, किशोर गाथाडे, समीर सेतलु, शिवाजी दाभोळे, अर्चना कोळी, वैशाली दिड़े संदीप भुंम्बक, तरलोचनसिंग रत्तू, कैलास गोरवे, चंद्रकांत दाभोळे आदी निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.




