हिंजवडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. या घटनेचा मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला असून अशोक धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.


या हल्या मागे काही राजकीय शक्तीचा हात असून या घटनेचा मुळशी राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध करत मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे व युवक अध्यक्ष सागर साखरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. निवेदनात हल्ले खोरांना अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पौड पोलीस ठाण्यातही निवेदन देण्यात आले व भारतीय जनता पक्ष आणि अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आल्या.




