पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर हे झपाटयाने वाढणारे शहर आहे. या शहरामध्ये विविध ठिकाणी बांधकाम व्यवसायांकडून मोठ-मोठे गृहप्रकल्प उभारले जात असून ज्या बांधकाम व्यवसायिकांनी भोगवटाधारक प्रमाणपत्र प्राप्त करून सदर गृहप्रकल्प संबंधित रहिवाशांना हस्तांतरित केलेले आहे. अशा गृहसंकुलनामध्ये महानगरपालिकेमार्फत कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा दिल्या जात नाही.i शहरातील भोगवटाधारक प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या गृहसंकुलास महानगरपालिकेमार्फत मुलभुत सुविधा देणेबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे माजी नगरसेविका माया बारणे यांनी केली आहे.
अशा गृहप्रकल्पामधील रहिवाशी कर भरत असून या करापासून महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढलेले आहे. ज्या बांधकाम व्यवसायिकांनी भोगवटाधारक प्रमाणपत्र प्राप्त करून सदर गृहपकल्प संबंधित रहिवाशांना हस्तांतरित केले आहे अशा गृहप्रकल्पामध्ये महानगरपालिकेमार्फत पाणी-पुरवठा, विदयुत, ड्रेनेज, आरोग्यविषयक अशा मुलभुत सुविधा देण्यात याव्यात.
सदर गृहप्रकल्पातील रहिवासी दरमहिन्याला पाच ते दहा हजार रूपये मेन्टेनन्स सोसायटीकडे जमा करतात जर त्यांना महानगरपालिकेच्या वतीने मुलभुत सुविधा पुरविल्या तर त्यांचा दर महिन्याला होणारा मेन्टेनन्स खर्च कमी होऊन त्यांना आर्थिक दिलासा मिळेल असे माया बारणे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


