मुंबई : विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. यामुळे सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. तसेच सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.
यावर “बाप बेटे जेलमे नहीं जायेंगे” राऊत यांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार असे भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी म्हटले आहे. मात्र आज किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
आज कोर्टात झालेल्या सुनावणीत सोमय्या यांच्या वकिलाने विक्रांतसाठी जमा केलेले पैसे भाजप पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात जमा केले असल्याचे सांगण्यात आले आहे.



