चिखली : पिंपरी-चिंचवड शहराच्या परिसरातील सोनवणे वस्ती या ठिकाणी आज दिनांक 11 एप्रिल रोजी दुपारी भीषण आग लागली. याठिकाणी लागलेल्या आगीमध्ये जवळपास सहा ते सात कंपन्या पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहर आगीच्या घटना वाढत चालले असून दोन दिवसापूर्वी मोशी कचरा डेपोला मोठी आग लागली होती. त्यानंतर आज चिखली येथे मोठी आग लागली आहे.
चिखली येथील सोनवणे वस्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आज दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान सुरुवातीला एका कंपनीला सोनवणे वस्तीमध्ये आग लागली. अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचू न शकल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यात 6 ते 7 कंपन्या अल्प वेळात कंपन्या जळून गेल्या आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंपन्यांचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान या आगीमध्ये झाले. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून दहा ते बारा अग्निशमन कंपनीच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली आहे. चिखली परिसरामध्ये उन्हाळ्यामध्ये वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असतात. चिखली येथे अग्निशमन केंद्र नसल्याने आग आटोक्यात आणणेमध्ये अग्निशमन विभागाला अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे चिखली येथे अग्निशमन केंद्र तातडीने तयार करण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



