पनवेल : मविआचे निवडून आलेले आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते शक्य झाले नाही म्हणून ईडी, इन्कम टॅक्सची धाड टाकली जात आहे. ईडी काय महाराष्ट्रातच आहे का? भाजपाचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का? असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
आजपासून (११ एप्रिल) राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातून झाली. यावेळी जयंत पाटील बोलत होते. त्यांनी उरण विधानसभा मतदारसंघाचा आढावा देखील घेतला.
जयंत पाटील म्हणाले, धाडसत्रांना घाबरत नाही म्हणून काही लोक आणखी अस्वस्थ झाले आणि त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेकीचा हल्ला घडवून आणला. शरद पवार नेहमीच एसटी कामगारांसाठी लढले, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, मात्र काहींनी एसटी कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात चिथावणीखोर भाषणे दिली. त्यातून हे घडले



