मुंबई : सिल्वर ओकवरती एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची भेट घेतली. यावेळी पवार साहेबांनी पिंपरी-चिंचवड सर्व पदाधिकाऱ्यांची मनमोकळ्या गप्पा मारल्या.



शरद पवार साहेबांचा सहवास हा नेहमीच ऊर्जा देणारा तर त्यांचे शब्द उत्साह वाढवणारे असतात अशी प्रतिक्रिया पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी म्हटले आहे. याप्रसंगी माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहाल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राजू मिसाळ, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, पंकज भालेकर पदाधिकारी उपस्थित होते.


