महाराष्ट्र माझा, १२ एप्रिल
अस्सल मराठमोळ्या रांगड्या कोल्हापुरी मटन-भाकरीची अस्सल गावरान चव घेण्यासाठी खवय्ये कायमच आतुरलेले जातात. या चवीसाठी नागरिकांना कोल्हापूरला जाण्याची गरज लागू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या “हॉटेल राजवर्धन” १०० टक्के बोकडचे मटन भाकरीबरोबरच चिकन, गावरान चिकन व सी फूडचादेखील आस्वाद घेण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे.
मागील १३ वर्षांपासून ‘हॉटेल राजवर्धन’ खवय्यांच्या जिव्हेचे लाड पुरवत आहे. त्यामुळे उद्योगनगरीबरोबरच आसपासच्या परिसरातून देखील खवय्ये याठिकाणी मांसाहारासाठी आवर्जून हजेरी लावतात.थरमॅक्स चौकातून आकुर्डी रोडवर गरवारे वॉल रोप कंपनी लगत सहजपणे दृष्टीस पडते. गेल्या बारा वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या हॉटेल राजवर्धनमधील कोल्हापुरी तांबडा, पांढरा रस्सा जीभेवर रेंगाळत राहतो. या ठिकाणी शाकाहाराबरोबच व मांसाहारातील विविध डिशने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मांसाहारी थाळी मध्ये राजवर्धन मटण थाळी, मटण मसाला थाळी, मटण फ्राय थाळी, मटण आळणी थाळी अशा ४ प्रकारच्या थाळी उपलब्ध आहेत. तसाच चिकन व गावरान चिकन मध्येही आहेत. बोकडाच्या मटणाची चव तुम्ही न चाखल्यास याठिकाणची भेट अर्धवट राहिल, अशी खवय्यांची भावना आहे.अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक जण खास कुटुंबासोबत येतात.
याठिकाणी केवळ मांसाहारीच नव्हे तर शाकाहारी डिशलादेखील खवय्यांची मनापासून दाद मिळाली आहे. पनीर मसाला आणि पनीर टिक्का मसाला यासारख्या अनेक पंजाबी डिशेस व कोल्हापुरी पिठलं मटकी मसाला, मटकी फ्राय, बैगन मसाला अशी मराठमोळ्या डिशेस मधील कोल्हापुरी मसाल्यांचा वापर यानेे एकदम चव कडक आहे. यासोबत बाजरी ज्वारी भाकरी, तंदूर रोटी, नान रोटी आदी सुविधा देण्यात येत आहेत.
चवीत कोणतीही तडजोड न करता, खवय्यांच्या जिव्हेचे चोचले पुरविणारे ‘हॉटेल राजवर्धन’ अशी या कोल्हापुुरी हॉटेलची ओळख आहे. ‘हॉटेल राजवर्धन’ मधील अस्सल कोल्हापुरी टेस्टमुळे खवय्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मसाल्यांच्या योग्य मिश्रणामुळे प्रत्येक डिश कोल्हापूरची लाजवाब चव जणाविते आहे.
ग्राहक देवो भव आणि सचोटीने केलेला व्यवसाय या दोन गोष्टींच्या बळावरच एक तपांहून आधिक काळ पिंपरी चिंचवड उद्योगनगरी मध्ये पाय रोवून मराठी उद्योजक म्हणून उभा राहू शकलो आहे, अशी प्रांजळ कबुली सातारा जिल्हा मधील कराड तालुक्यातील बबन पवार यांनी बोलताना दिली.