- अध्यापक महाविद्यालय येथे श्री. वर्धमान महावीर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
तळेगाव स्टेशन ( वार्ताहर) वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालयात 14 एप्रिल रोजी श्री भगवान वर्धमान महावीर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध इतिहास अभ्यासक डॉ. प्रमोद बोराडे होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांचे जीवन कार्य याविषयी माहिती सांगून त्यांनी सांगितलेली तत्वे आजच्या विद्यार्थ्यांना व युवकांना सुजान भारत घडवण्यासाठी कशी उपयोगी पडतील याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अशोकजी बाफना होते.
सदर कार्यक्रम धैवत व मध्यम गटाचे विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक डॉ. अनिता धायगुडे व डॉ.संदीप गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. यावेळी स्वेतल भोसले हिने श्री वर्धमान महावीर यांची व अर्चना बोरले हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सुबक रांगोळी काढली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री जगताप हिने केले, प्रास्तविक अर्चना जगताप हिने केले. सुदाम गवळी यांनी वर्धमान महावीर व माधुरी कोल्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती सांगितली. वृषाली पवार हिने पाहुण्यांची ओळख करून दिली. तर शितल जाधव हिने आभार मानले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य महादेव सांगळे, डॉ. कविता तोटे, डॉ. शीतल देवळालकर, प्रा. ज्योती रणदिवे, प्रा सोनाली पाटील, प्रा. सुजाता जाधव, श्री.मोहन कडू, श्री.सुरेश घोजगे व विनायक येळवंडे उपस्थित होते.




