तळेगांव स्टेशन (प्रतिनिधी) पंचायत समिती मावळ (शिक्षण विभाग ) यांच्यातर्फे इ.पाचवी व इ. आठवी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा दिनांक 12/4/2022 रोजी एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल तळेगाव दाभाडे येथे पार पडली.
सुधीर भागवत गट विकास अधिकारी,पं. स. मावळ आणि मा.श्री बी.के राक्षे गटशिक्षणाधिकारी, पं. स. मावळ यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2021- 22 मध्ये येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. एकंदरीत आपल्या तालुक्याचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल हा अधिक लागावा व अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत यावेत या उद्देश्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
अवघड घटक कमी वेळात सोप्या पद्धतीने सोडविणे, शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या टिप्स देण्यात आल्या . शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन निराकारण करता यावे या दृष्टीकोनातून सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर प्रशिक्षणाला सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, तालुक्यातील 98 जि.प. प्राथ.शाळेतील 103 प्रशिक्षणार्थी (शिक्षक ) उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान मा.सुधीर भागवत गटविकास अधिकारी पं.स.मावळ व मा.बी.के. राक्षे गटशिक्षणाधिकारी, पं. स. मावळ यांनी प्रशिक्षणार्थींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.सदर प्रशिक्षणाचे प्रास्ताविक मा. वाळुंज विस्तार अधिकारी पं. स. मावळ यांनी केले. तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्रीकांत दळवी, बबन पुंडे व विलास पुंडे यांनी जबाबदारी पार पाडली. सदर कार्यशाळा आनंददायी व खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.
सदर कार्यशाळेसाठी एम्प्रोस स्कूल द्वारे उत्तम बैठक व्यवस्था उपलब्ध करून दिली.प्रशिक्षणार्थीचा प्रतिसाद उत्तम मिळाला .सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार श्रीम. ज्योती लावरे विषय साधनव्यक्ती पं. स.मावळ यांनी केले.




