बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. फिटनेसच्या बाबतीत अतिशय जागरुक असणाऱ्या मलायकाच्या सोशल मीडिया पोस्ट बरेचदा व्हायरलही होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच मलायकाच्या कारला अपघात झाल्यानंतर तिनं सोशल मीडियावर स्वतःचा कोणताही फोटो शेअर केला नव्हता. पण आता मात्र तिने अपघातानंतर पहिल्यांदाच एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होताना दिसत आहे.
मलायका अरोरा पुण्यातील एक फॅशन इव्हेंट आटोपून मुंबईमध्ये परतत असताना तिच्या कारला अपघात झाला होता. ज्यात मलायकाच्या कपाळाला किरकोळ दुखापत झाली होती. त्यानंतर आज पहिल्यांदाच तिने एक सेल्फी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यामध्ये तिने ब्लॅक कलरचा टॉप आणि डोक्यावर कॅप घातलेली दिसत आहे. तिचा हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हा फोटो शेअर करताना तिने त्याला, ‘हिलिंग’ असं कॅप्शनही दिलं आहे


