महाराष्ट्र माझा,16 एप्रिल : राष्ट्रवादीत असतानाचे एकेकाळचे खंदे समर्थक व भाजपचे चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप यांची उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बाणेर येथील खाजगी रुग्णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडून केली जाणार होती. मात्र, आपले एकेकाळचे खंदे समर्थक व भाजपवासी झालेले लक्ष्मण जगताप हे दवाखान्यात उपचार घेत असल्याने याची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उद्घाटन कार्यक्रम घेणे चुकीचे ठरते यासाठी उद्घाटन कार्यक्रम रद्द केले. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात विकास कामात लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना मोठी साथ दिली होती. ते सध्या भाजप पक्षात आहेत.
https://maharashtramaza.online/?p=153707
आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अजितदादा यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. याच नात्यातून मुंबईवरून पुण्यात येताना अजितदादांनी त्यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी थेट रुग्णालयात पोहचले. जगताप यांची प्रकृती सुधारत आहे समजते. ते शहरातील आमदार असल्याने कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे शहरात विकासकामांचा काही कार्यक्रम करू नये अशी सूचना अजितदादांनी महापालिका प्रशासनाला दिली. त्यामुळेच आज पालिकाकडून होणारे सर्व कार्यक्रम काल रात्री रद्द केले होते.



