कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या मतदानाची मोजणी सध्या सुरू असून यामध्ये १४ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यानुसार आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर असून भाजपचे सत्यजित कदम हे पिछाडीवर आहेत. महाविकास आघाडी विरोधात भाजप अशा अंत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
आतापर्यंत निकालानुसार, मतमोजणीच्या चौदाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ९६२२६ मतं मिळाली असून भाजपचे सत्यजित कदम हे ७७४२६ मतांवर आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच जयश्री जाधव या आघाडीवर असल्यामुळे त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार या पोटनिवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला तर काँग्रेसच्या जाधव यांचा झाला असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

या निवडणुकीत भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत भाजप प्रतिनिधी निवडून नाही आला तर मी संन्यास घेऊन हिमालयात जाईल अशा पद्धतीचे वक्तव्य केल्यामुळे कोल्हापुरात जोरदार चर्चा रंगली होती. यांनी प्रतिष्ठेसाठी भाजपची राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांची फक्त प्रचारात उतरली होती. पोट निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने सोशल मीडियात चंद्रकांत पाटील यांचा हिमालयात जाऊन बसलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया



