महाराष्ट्र माझा, १८ फेब्रुवारी
कणखर नेतृत्व, प्रशासनावर उत्तम पकड, प्रबळ इच्छाशक्ती, अडचणीच्या काळात खंबीर साथ देणारे, महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असणारे, मनमोकळेपणा, धाडसी निर्णय, परखड वक्ता असे व्यक्तिमत्त्व असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नाव घेताच “आपला जिवाभावाचा माणूस‘ असे प्रत्येकाच्या मनाला वाटते. त्यामुळेच दादा रागविले तरीही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाराज होत नाही. कारण, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांविषयी असलेली त्यांची तळमळ आणि सुख-दु:खात धावून जाणारा नेता अशी प्रतिमा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
अजितदादांची ही प्रतिमा पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना पुन्हा अनुभवली. शनिवारी पुण्यात आल्यानंतर सर्व प्रथम आपले जुने सहकारी व भाजपवाशी झालेले आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी थेट रुग्णालयात पोहचले. त्याच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यांचे बंधू विजय जगताप यांच्याकडे लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस करून शंकर जगताप यांच्याशी संपर्क साधला आणि काही गरज लागली तर कळवा असा निरोप देऊन जगताप बंधूंना धीर दिला.

आपले विधानसभा सदनातील सहकारी आजारी असल्याने शहरात नियोजित कार्यक्रम रद्द करण्याची सूचना महापालिका प्रशासन आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना दिले. तर दुसरीकडे चिन्मय मांडलेकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पार पडला. हा कार्यक्रम म्हणजे त्याआडून धार्मिक दरी वाढविण्याचा हा एक नाहक प्रकार होता. राज्यात आणि एकूणच राजकारणात अस्थैर्य निर्माण करण्यासाठी भाजपाई संघटना असे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामधील हा एक भाग होता. तर आपल्याच पक्षाच्या एका स्थानिक आमदाराच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी काळजी करण्यापेक्षा स्थानिक व वरिष्ठ भाजप नेत्याना कार्यक्रम जास्त महत्त्वाचा वाटला. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता मिळवून देणाऱ्या आमदारापेक्षा भाजपाईंनी कार्यक्रमाला महत्त्व दिले हे गैर होते.
या पार्श्वभूमीवर नामदार अजितदादा यांची संवेदनशीलता पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना जास्त प्राकर्षाने जाणवणारी ठरते. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रयत्नाने या शहरात राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली, हे कटू सत्य आहे. तरीही आपला एक विधानभवनातील सहकारी, मग तो विरोधी पक्षाचा असलातरी, गंभीर आजारी असताना, कार्यक्रम वगैरे करणे आणि तेही पिंपरी चिंचवड शहरात, हे विरोधी पक्षातील अजितदादांना गैर वाटले. मात्र, भाजप पक्षाचा कार्यक्रम राबविण्यापुढे कसलीच तमा न बाळगता शहारातील भाजपाईंनी कार्यक्रम पूर्ण केला. शहर भाजपच्या एका स्थानिक नेत्याच्या कार्यक्रमाला हजर असलेले भाजपचे राज्य प्रवक्ते आशिष शेलार यांनी कार्यक्रम रद्द करणे सोडाच, लक्ष्मणभाऊ जगताप यांची साधी भेट घेणेही नाकारले.




