राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसेकडून पुण्यात घेण्यात येणाऱ्या हनुमान चालिसा कार्यक्रमावर सडकून टीका केलीय. राज ठाकरे देवाकडे पण वेळेवर जात नाहीत, असा खोचक टोला जयंत पाटलांनी विचारला. मनसेकडून कसबा मतदारसंघात हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्याला राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही पुण्यात मुस्लीम बांधवांच्या हस्ते आरती ठेवण्यात आलीय. याविषयी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील पुण्यात बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, “हनुमान चालिसा हनुमान जयंतीलाच झाली पाहिजे. राज ठाकरे परवा येऊन काय उपयोग आहे? तुम्ही देवाकडे पण वेळेवर जात नाहीत. रोजही हनुमान चालिसा होते. माझ्या मतदारसंघात माझ्या निवडणुकीआधी माझे कार्यकर्ते सर्व हनुमान मंदिरांमध्ये हनुमान चालिसा करतात. त्याचं आम्ही प्रदर्शन करत नाहीत, लोकांना दाखवत नाही. त्याचं प्रदर्शन करायचं नसतं.