तळेगाव दाभाडे (वार्ताहर) बेकायदेशीर सोमाटणे टोलनाका हटवा या भूमिकेवर ठाम असलेल्या सर्वपक्षीय टोल हटाव कृती समितीच्या वतीने तळेगाव येथील लिंब फाय ते सोमाटणे टोल नाक्यापर्यंत विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मोर्चामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. कोणातही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता या विराट मोर्चाला टोलनाक्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावरच पोलिसांनी रोखले.
लिंबफाटा ते सोमाटणे टोलनाका पर्यंत हजारोच्या संख्येने सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कडक ऊन असूनही मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी अकरा वाजता लिंब फाटा येथे सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित झाले. जन आक्रोश मोर्चाचे नेतृत्व जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी केले.
शिववंदना घेऊन जनआक्रोश मोर्चाची सुरुवात झाली. मोर्च्याच्या वेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, रणजित सावंत, सत्यवान माने, अधिकारी दुर्गनाथ साळी, महेश मतकर, तसेच राज्य राखीव पोलीस बल यांचा सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिसांनी टोल नाक्याच्या अर्धा किलोमीटर अंतरावर रोखले. त्या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. जन आक्रोश मोर्चा सकाळी साडे अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरु होते जुना मुंबई-पुणे महामार्ग एक तास बंद असल्याने दुतर्फा ६६ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन संपल्यावर पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली.
यावेळी याठिकाणी खासदार श्रीरंग बारणे, सत्यशिलराजे दाभाडे, माजी मंत्री संजय भेगडे, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, नगरसेवक किशोर भेगडे, अमोल शेटे, मिलिंद अच्युत, गणेश खांडगे, किशोर भेगडे, रविंद्र भेगडे, गणेश काकडे, स्पेश म्हाळस्कर, यादवेंद्र खळदे, दत्तात्रय भेगडे, देवा खरटमल, सुनिल पवार, सुरेश चौधरी, अनिता पवार, संतोष दाभाडे, अरुण माने, अमोल शेटे आदी उपस्थित होते. मानले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष दाभाडे यांनी केले.



