बीआरटी मार्गावरील पुणे मुंबई रोडवरील पिंपरी चौकात बीआरटी सिग्नलमुळे इतर वाहनचालकांची तारांबळ होताना दिसत आहे. सिग्नल हिरवा होताच इतरही वाहन चालक आपली वाहने दामटत असल्याने सिग्नलचे उल्लंघन होण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.
पुणे- मुंबई महामार्गावर बीआरटी मार्गात चौकाचौकात सिग्नल बसविले आहे. इतर वाहनांचे सिग्नल व बीआरटी मार्गाचा सिग्नल वेगळा आहे; मात्र बीआरटीचा हिरवा सिग्नल लागल्यानंतर अनेक वाहनचालक ग्रीन सिग्नल मिळाला म्हणून निघून जातात.
इतरही वाहन चालक त्यांच्यामागे धाव घेत असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे; तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्या वाहनचालकांना दंड सोसावा लागत आहे.


