पिरंगुट – चित्रपटात दाखविलेलं तसं चित्र मुळशीत नाही. अपवाद वगळता इथली मंडळी शांत आहेत. मुळशीतील नागरिकांनी एकत्र येऊन पोलीस भरतीसाठी तरुणांना प्रशिक्षणासाठी पाठवावे, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले.
कोंढुर (ता. मुळशी) येथे स्व. विठ्ठल कोंढरे स्वागत कमानीचे उद्घाटन उपायुक्त भोईटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भोईटे म्हणाले की, गावचे सुपूत्र असलेले आणि पोलीस खात्यात कनिष्ठ अधिकारी पदावर काम केलेल्या स्व. विठ्ठल कोंढरे यांची स्मृती कमानीच्या रूपाने जिवंत ठेवताय, याबद्दल कोंढूर ग्रामस्थ आणि माजी सभापती महादेव कोंढरे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. स्व. विठ्ठल कोंढरे यांच्या कार्यकाळात तत्कालीन पोलीस खात्याने गुंडा विरोधी पथकाची स्थापना केली होती. त्यावेळी त्या पथकाने केलेल्या कामगिरीची प्रतिमा अजूनही टिकून आहे.
या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे निवृत्त पोलीस अधिकारी राम जाधव, गटविकास अधिकारी संदीप जठार, ज्येष्ठ नेते राजेंद्र हगवणे, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, माजी अध्यक्षा सविता दगडे, माजी सभापती महादेव कोंढरे, पांडुरंग ओझरकर, महिला आघाडीच्या स्वाती ढमाले, राधिका कोंढरे, बाजार समितीचे उपसभापती दगडूकाका
करंजावणे, संचालक अंकुश उभे, कार्याध्यक्ष अंकुश मोरे, नियोजन समिती सदस्य अमित कंधारे, हभप रामचंद्र भरेकर, माजी सदस्या स्वाती हुलावळे, अंजली कांबळे, माजी सभापती कोमल वाशिवले, सरपंच सारिका वैद्य, उपसरपंच सारिका कुडले, संचालक चंद्रकांत भिंगारे, माजी अध्यक्ष सुनील वाडकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात राजेंद्र कोंढरे यांनी स्व. विठ्ठल कोंढरे यांच्या कार्याचा आढावा घेतला. माजी सभापती व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी आभार मानले.




