मुंबई : देशामध्ये कोरोना पुन्हा एकदा आपले पाय पसरवताना दिसत आहे. मागील 24 तासात कोरोनाचे 1247 नवीन रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. देशात मागील काही दिवसापासून कोरोना घट झाली असताना अचानक पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढू लागली आहे.
राज्यासह देशांमधील कोरोना यांच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली होती. मात्र, नव्याने येणारे आकडेवारी धडकी बसवणारी आहे. चौथ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस पुन्हा बंद होतील का? आणि पुन्हा एकदा ऑनलाईन शिक्षण पद्धतीच सुरू होणार का? या चिंतेने शाळकरी मुलांना व पालकांना विचार पडला आहे.


