वडगाव मावळ (प्रतिनिधी) वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी संतोष दिनकर जाधव यांनी नियुक्ती झाली.
डोंगरी (मुंबई) पोलीस स्टेशन येथून त्यांची बदली वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये झाली. त्यांची विशेष ओळख गुन्ह्यातील आरोपी अटक करणे ही आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल पोलीस निरीक्षक विलास भोसले, पोलीस उप निरीक्षक विकास सस्ते, शीला खोत, कर्मचारी मनोज कदम, संजय सुपे, अंकुश मिसाळ, आशिष काळे, सिद्धार्थ वाघमारे आदींनी स्वागत सत्कार केला.




