महाराष्ट्र माझा, २१ एप्रिल
आपला लाडक्या नेत्याची प्रकृती अस्वस्थ असताना कार्यकर्त्याच्या मनातही घालमेल होणे स्वाभाविकाच… पिंपरी चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी देवाला साकडं घातलं आणि त्याचा दुवाला फळ मिळत असल्याचे दिसून आले. भाऊंना डॉक्टरांनी व्हेंटिलेटर काढल्याचे तसेच ते स्वतः प्रतिसाद देत असल्याचे सांगितले. त्यामुळे दुवा आणि दवा दोन्हीची प्रचिती आल्याचे समाधान कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. रुग्णालयातील डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. तर गेले ८ दिवस झाले सर्व कार्यकर्ते रुग्णालयात ठाण मांडून आहेत. तर काही त्यांच्या दीर्घायुष्यकरीता प्रार्थना करत आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात काय कमवलं हे वेगळं सांगण्याची गरज नाही, हे मागील आठवड्यात घडलेल्या घडामोडीनंतर दिसून येते.
राजकारणा पलीकडचे भाऊ…
आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यातुन आलेल्या गोरगरिबांची अनेक वर्षे सेवा केली. कोरोना संसर्गजन्य संकटाच्या काळात गोरगरिबांना स्वतंत्र आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली. तर भुकेलेल्याना अन्नाचा घास दिला, त्याचेच हे फळ असल्याचे रुग्णालयात अनेकांच्या तोंडातून येत होते. पिंपरी चिंचवड शहरात गोरगरिबांना आरोग्यासाठी मदत लागली की त्यांना भाऊंनी केव्हाही परत पाठविले नाही. याच गोरगरिबांच्या आशिर्वादाने आज ‘लक्ष्मण जगताप’ यांना पुनर्जन्म मिळाला.
‘भाऊंना’ जनतेचा आशीर्वाद आणि प्रार्थनाचा बूस्टर !
आपल्या लाडक्या नेत्याकरिता परमेश्वराकडे साकडे घातले जात आहे. लक्ष्मण भाऊंचा चाहता वर्ग संपूर्ण शहरात कायम आहे. प्रत्येकाने आपल्या लाडक्या नेत्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत नेता आणि कार्यकर्त्याच्या नात्यातील निरपेक्षतेचे दर्शन घडवले. जीवाभावाच्या मावळ्यांच्या प्रार्थना लक्ष्मणभाऊंना शक्ती देत आहेत. सर्वांच्या शुभेच्छा, प्रार्थना, होम हवन व आशीर्वादाने सर्वांचे लाडके भाऊ शहरवासीयांची सेवा करण्यासाठी पुन्हा लवकरच रुजू होतील असे त्यांच्या कुटूंबियांनी यावेळी सांगितले.



