पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे नवीन नवनिर्वाचित आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच शिंदे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
राज्य गृह विभागाने काल (दि. २०) संध्याकाळी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झाली आहे. अंकुश शिंदे यांची पिंपरी चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्ण प्रकाश यांची पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड येथून बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती विशेष पोलिस महानिरीक्षक (व्ही.आय.पी. सुरक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे करण्यात आली आहे.
दरम्यान, विशेष पोलिस महानिरीक्षक सुधार सेवा, मुंबई येथे कार्यरत असलेले अंकुश शिंदे यांची पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली त्यांनी आज पदभार स्वीकारला.




