चिंचवड : स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ते कामात कमालीचा अस्वस्थ पणा आढळून येत आहे. चिंचवड लिंक रोडवरील स्मार्ट सिटी अंतर्गत अर्बन स्ट्रीट फुटपाट डेव्हलप करण्यात आला आहे. त्यासाठी रस्त्यावर नवीन एलईडी दिवे लावण्यासाठी पदपाथवर नट बोल्ट उघड्यावर ठेवण्यात आले आहे. यामुळे रस्त्याने जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुलांना यामुळे सर्वाधिक धोका जाणवत आहे.





लिंक रोडवरील फुटपाथचे काम होऊन अनेक दिवस झाले तरीही लाईटसाठी नट बोल्ट उघड्यावर ठेवले आहेत. आजतागायत त्यावर दिवे लावले गेले नाही. या रोडवर सायंकाळी सर्वाधिक गर्दी असते. अनेक नागरिकांना फूटपाथवर चालताना उघड्या नटांचा अंदाज न आल्यामुळे पडून अपघात घडले. काही जेष्ठ वृद्ध नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
याबाबत काही दक्ष नागरिकांनी पालिका प्रशासनास या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. मात्र स्मार्ट सिटी अंतर्गत ठेकेदार व प्रशासन यांच्यामध्ये बिलकुल समन्वय नसल्यामुळे सदर प्रश्न उद्भवला आहे. पूर्वी ठेकेदाराला फुटपाथच्या लेव्हलला नट बोल्ट बसण्यास सांगितले नंतर पोल बसत नाही. त्यामुळे आजपर्यंत लाईट खांबे न बसल्याने अपघात घडत आहेत. यासाठी लवकरात लवकर पोल बसवा अन्यथा आहे पालिका प्रशासनाने हे नट-बोल्ट काढून टाकावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


