पिंपरी ( प्रतिनिधी ) गेल्या ५७२ दिवसांमध्ये अवैध धंद्यांवर हुन ७०० अधिक कारवाया करत पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अवैध धंद्यांवर चाप बसविला होता. मात्र नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यानी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी पथक बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ५ सप्टेंबर २०२० राजी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवशी झिरो टॉरलन्स अन्वये एकही अवैध धंदा चालू देणार नाही , असे पत्रकार परिषदेत सांगितले.
अवैध धंद्यांवर अंकुश राहावा यासाठी त्यांनी २६ सप्टेंबर २०२० मध्ये सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली . या पथकात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कर्मचाऱ्यांचा रेकॉर्ड पाहून स्वतः कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. कर्मचाऱ्यांनीही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत अवघ्या दिवसांमध्ये ७०० हून ५७२ अधिक कारवाया केल्या. अगदी करोनाकाळात देखील या पथकाने आपल्या कारवायांचा आलेख उंचावत ठेवला होता.
सामाजिक सुरक्षा पथकाने ७०० हून अधिक ठिकाणी अवैध धंद्यांवर छापे टाकले . यामध्ये २ हजार २०० हून अधिक जणांना अटक केली . या कारवायांमध्ये तब्बल १६ कोटींचा मुद्देमाल हस्तगत कला . सामाजिक सुरक्षा पथकाने गॅस चोरी , ऑईल मिक्सिंग , मटका , जुगार , ऑनलाइन लॉटरी , व्हिडिओ गेम , वेश्या व्यवसाय , स्पा सेंटर , अवेध दारू विक्री , हुक्का पार्लर , गुटखा , अंमली पदार्थ , गोमांस , शस्त्र आदी कारवाया केल्या . शहरातील अवैध धंद्यांना चाप बसविल्यामुळे कृष्णप्रकाश यांची लोकप्रियता अधिकच वाढली होती.



