पिंपरी : २५ एप्रिल रोजी प्रभाग क्रमांक १२ मधील रुपीनगर, अजिंक्यतारा सोसायटी भागामध्ये ‘फ ‘क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा विभाग यांच्या पथकाने एकूण १२ अनधिकृत नळजोड बंद केले. मनपाचे थेट नळाला लावलेल्या एकूण ८ विद्युत मोटर्स जप्त केल्या.


या कारवाई पथकामध्ये उप अभि. १, क.अभि. २, मीटर निरिक्षक २, महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे ४ कर्मचारी, मनपाचे प्लंबर २, फिटर २, मजूर ४, वायरमन २,अतिक्रमण गाडी चालकासह १ अशा एकूण २१ जणांच्या पथकाने ही कारवाई केली.
सदर कारवाई शहाजी गायकवाड ,उप अभियंता,अभय कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता, मीनल दोडल, कनिष्ठ अभियंता, फ क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा विभाग यांच्या पथकाने केली. हि कारवाई सह शहर अभियंता ,पाणीपुरवठा विभाग व कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा फ क्षेत्रीय कार्यालय यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


