वडगाव मावळ : मावळ तालुक्यात जल जिवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध गावांतील पाणी पुरवठा योजनांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांनी गट विकास अधिकारी सुधीर भागवत यांच्याकडे सोमवारी (दि.२) केली आहे.
राजेश खांडभोर यांनी गटविकास अधिकारी भागवत यांना दिलेल्या निवदनात असे म्हंटले आहे की, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे व मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून महाविकास आघाडी ठाकरे सरकारच्या माध्यमातून मावळ मध्ये मोठ्या प्रमाणावर जल जीवन मिशन अंतर्गत अनेक ग्रामपंचायत मध्ये कामे सुरु आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या माध्यमातून या बाबत स्थानिक ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या उपस्थित सर्वे करण्यात आले असून दरम्यान प्रत्यक्ष सर्वे प्रमाणे सदर योजनेचे काम होताना दिसून येत नाही.
तसेच जी आय लोखंडी पाईप चे इस्टिमेण्ट असून टेकेदार काळे प्लास्टीकचे निकृष्ट पाईप वापरत आहे किंवा प्लास्टिक पाईप चे काही ठिकाणी इस्टिमेण्ट असलेल्या ठिकाणी छोटे गेजचे पाईप वापरत आहे सर्वे एक ठिकाणी व पाईप लाईन दुसऱ्या ठिकाणी होत आहे. आपण आतच या योजनेचे काम सुरू असताना या कामांची उच्च स्तरीय चौकशी करावी आपण या बाबत दिरंगाई केल्यास आपल्या दालन समोर शिवसेनाच्या वतीने तिव्र आंदोलन केले जाईल हि योजना पाणी टंचाई कायम स्वरूपाची मिटवणे संदर्भात केंद्र सरकारने ४०% व राज्य शासन ४०% व ग्रामपंचायत १०% अश्या स्वरूपात असून टेकेदाराला चुकीच्या कामा बद्दल किंवा भ्रष्टाचार करण्यासाठी नेमले नाही या बाबत पाणी पुरवठा आधीकारी जाणीपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.
याबाबत आपण योग्य ति कारवाई करावी असे शिवसेनेच्या वतीने निवेदनात म्हटले आहे, यावेळी निवेदन देताना शिवसेना मावळ तालुका शिवसेना प्रमुख राजेश खांडभोर, उपतालुकाप्रमुख मदन शेडगे उपस्थित होते.




