पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज शहरातील तिन्ही विधानसभा अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते भोसरी विधानसभा अध्यक्षपदी पंकज भालेकर पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी श्याम लांडे तर चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी विनोद नढे यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिका निवडणुकीत लागला होता. त्यानंतर राज्यात सत्तेत पुनरागमन केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. सुरुवातीला पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपद बदलून नव्याने अजित गव्हाणे यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवली आहे. सोबतीला तिन्ही विधानसभा कार्याध्यक्ष व एक प्रवक्ते, शहर महिला अध्यक्ष व युवक अध्यक्ष नवीन कार्यकारणी सोबत दिले होते. त्यानंतर आज पिंपरी-चिंचवड व भोसरी विधानसभा अध्यक्षपदी नवीन तीन युवा चेहऱ्यांना संधी देत पक्षाची बांधणी अधिक अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयामुळे महापालिका निवडणूक यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका कधीही जाहीर केल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. मागील पाच वर्षात विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपने सत्ताकाळात महापालिकेत केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणांची पोलखोल करण्यासाठी व अधिकाधिक पक्षसंघटना बळकट करण्यासाठी आणि महापालिकेतील भाजपला हद्दपार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नव्या दमाच्या युवकांना सोबत घेऊन कामाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत सर्वाधिक युवकांना संधी दिल्यामुळे सर्वच घटकातील नागरिक पक्षासोबत कार्यरत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला महापालिकेत पुनरागमन करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.



