पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली. दिलीप बोरकर (वय- ३६) असे निधन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते शिरगाव चौकीत नाईक पदावर कार्यरत होते. आज सकाळपासूनच त्यांना बर नव्हते, दुपारी जेवण झाल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने झोपले. तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
दिलीप बोरकर हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिरगाव चौकीत कार्यरत होते. मनमिळावू आणि मितभाषी अशी त्यांची ओळख होती. सकाळपासून दिलीप यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांनी तस इतर सहकार्यांना सांगितलं. दुपारी इतर पोलीस सहकाऱ्यांबरोबर जेवण केलं. जेवण झाल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्याने ते चौकीतच झोपले. काही वेळाने त्यांना उठवण्यासाठी पोलीस कर्मचारी गेले, तेव्हा त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. ते २००७ च्या बँचचे होते असे पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. या घटनेमुळं त्यांच्या मित्र मंडळींना धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे



