पिंपरी : चिंचवड येथील जयहिंद अर्बन को ऑप बँकेची सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षीक कालावधीसाठी निवडणुक नुकतीच घेण्यात आली. निवडणुक अधिकारी म्हणुन सहकार खात्याचे श्री चंद्रशेखर गव्हाणकर- जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १ सहकारी संस्था पुणे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणुन व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणुन आशुतोष गोविंद सिंग परदेशी अप्पर लेखा परीक्षक श्रेणी २ यांनी काम पाहिले.
बँकेवर निवडणुकीचा आर्थिक खर्चाचा भार पडु नये म्हणून बँकेचे संस्थापक श्री. धनाजीराव विनोदे यांच्या नेतृत्वाखाली बँक निवडणुक बिनविरोध करण्याचे अवाहान सर्व सभासदांना केले व त्यानुसार त्यास प्रतिसाद देउन बँकेची निवडणुक ही बिनविरोध झाली. बँकेचे विनविरोध निवडुण आलेले संचालक पुढील प्रमाणे. सर्वसाधारण प्रतिनिधी – श्री. धनाजीराव रामभाऊ विनोदे, श्री. अतिश दशरथ लांडगे, श्री. राहुल संपत भोईर, श्री. गुलाव सुदामराव वाघोले, श्री. शांताराम खंडु भोंडवे, श्री अरूण बाबुराव भुमकर, श्री. सुधिर रघुनाथ वाल्हेकर, कु. अजिंक्य धनाजीराव विनोदे महिला प्रतिनिधी : सौ सुषमा धनाजीराव विनोदे, सौ. पल्लवी श्रीकांत पांढरे इतर मागास वर्ग प्रतिनिधी : श्री पंडीत जालींदर अल्हाट अनुसूचित जाती जमाती वर्ग: श्री. देवीदास गणपत लोंढे असे एकूण १३ जागांसाठी उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत.
भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी : श्री परिक्षीत सुभाष सोपनर


